Athani

संत बसवेश्वरांबाबत आक्षेपार्ह लिखाण; रवी हंज यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी

Share

‘बसव मंडप’ पुस्तकात संत बसवेश्वर यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण प्रसिद्ध झाल्याच्या निषेधार्थ अथणी येथे बसवभक्तांनी आंदोलन केले. संबंधित लेखक रवी हंज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत बसवेश्वर चौकात प्रतीकात्मक निदर्शने करून तहसीलदारांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले.

बाराव्या शतकातील महान समाजसुधारक संत बसवेश्वर यांनी समता, कायक, दासोह आणि मानवतेची मूल्ये जगाला दिली. त्यांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शक आहेत. मात्र, रवी हंज यांनी लिहिलेल्या ‘बसव मंडप’ पुस्तकातील संत बसवेश्वर यांच्याविषयीचे आक्षेपार्ह लिखाण बसवभक्तांच्या निदर्शनास आले असून, त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्याचे आंदोलकांनी सांगितले.

संत बसवेश्वर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा अवमान करणारे लिखाण निषेधार्ह असल्याचे सांगत, रवी हंज यांच्यासह या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी बसवभक्तांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन अथणीच्या तहसीलदारांना सादर करण्यात आले.

Tags: