Belagavi

एसएसएलसी निकालवाढीसाठी मराठा मंडळात मराठी विषय कार्यशाळा

Share

बेळगाव जिल्ह्याचा एसएसएलसी निकाल सुधारण्यासाठी मराठा मंडळ हायस्कूलमध्ये मराठी विषयाची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्यासह सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

चव्हाट गल्ली येथील मराठा मंडळ हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यशाळेत बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील मराठी विषयाच्या शिक्षकांनी सहभाग घेतला. प्रश्नपत्रिका सोडविण्याचे तंत्र, पत्रलेखन आणि निबंध लेखनाच्या तयारीबाबत बेळगुंदी हायस्कूलचे शिक्षक बी. एम. पाटील, मराठा मंडळ होनगा हायस्कूलचे वाय. एफ. पाटील आणि सांबरा जनता हायस्कूलचे पी. एल. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

बेळगाव शहराचे ईसीओ ए. एच. येळूरकर यांनी ‘मिशन ६० प्लस’ अंतर्गत अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष तयारी करून घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांना कोणताही ताण न देता परीक्षेला सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन शिक्षकांना केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. के. पाटील होते. यावेळी ग्रामीण ईसीओ एस. ए. अंकलगी, बेळगाव फोरमचे अध्यक्ष संजय नरेवाडकर, गांधी नगरचे सीआरपी गानगेरी, ज्येष्ठ शिक्षिका सातेर, सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. एम. पाटील, जिजामाता मुख्याध्यापिका एल. बी. जाधव, एम. एस. संभाजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Tags: