हुक्केरी येथे कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायण गटातर्फे कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी नोव्हेंबर महिन्यापुरता राज्योत्सव मर्यादित न ठेवता वर्षभर घराघरांत कन्नड उत्सव साजरा करावा, असे आवाहन उद्योजक पृथ्वी कत्ती यांनी केले.


हुक्केरी हिरामठाचे चंद्रशेखर महास्वामी आणि अभिनव मंजुनाथ देव यांच्या सान्निध्यात भुवनेश्वरी देवीच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पृथ्वी कत्ती यांनी इतर भाषिकांनाही प्रेमाने वागवून कन्नड भाषा बोलण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे सांगितले.
विद्युत सहकारी संघाचे अध्यक्ष महावीर निलजगी यांनी डीजे कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कन्नड साहित्य आणि ग्रंथांचे वाचन करून राज्याच्या भूमी आणि जलसंपत्तीच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मठाच्या स्वामींनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला कन्नड साहित्य परिषद अध्यक्ष प्रकाश अवलक्की, उदय हुक्केरी, प्रज्वल निलजगी, सुनील बैरन्नवर, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या हुक्केरी विभागाचे अध्यक्ष प्रमोद कूगे, प्रदीप रिजकनवर, रॉबिन कौजलगि, शांतिनाथ मगदुम, सौरभ तळवार, विल्सन कौजलगि, रिहान चत्तरकी, ज्ञानेश्वर गौडर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
रात्री उशिरापर्यंत डीजेच्या संगीतावर तरुणांनी ठेका धरला केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक शिवशंकर गणाचारी यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राजू बागलकोटी, इन न्यूज, हुक्केरी


Recent Comments