Belagavi

टायर फुटल्याने एसटी बस चढली रस्त्यावरील दुभाजकावर; प्रवासी सुखरूप

Share

बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यात धावत्या एसटी बसचा टायर अचानक फुटल्याने बस रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर चढल्याची घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले.

गुरुवारी पहाटे गुर्लापूरमार्गे अथणीकडे जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसचा अचानक टायर फुटला. त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या दुभाजकावर चढली. मूडलगी तालुक्यातील गुर्लापूर गावाच्या बाहेरील परिसरात ही घटना घडली. टायर फुटल्यानंतर बस थेट दुभाजकावर चढल्याने घटनास्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सुदैवाने या घटनेत बसमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित बचावले. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली होती.

Tags: