बेळगाव येथील निलेश पाटील यांनी महावीर गोशाळेत गोपूजन करून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली.

वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात पाटील कुटुंबीय आणि मित्रपरिवार सहभागी झाला. गोमातेचे पूजन करून तिचे संरक्षण आणि सेवा करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याच्या मागणीला पाठिंबा मिळावा, यासाठी उपस्थितांकडून स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.

या उपक्रमात मनिषा निलेश पाटील, अवधूत तुडवेकर, प्रथमेश यांच्यासह कुटुंबीय, हितचिंतक आणि समग्र गो-रक्षा पथकाचे सदस्य सहभागी झाले.


Recent Comments