State

राज्यात हाफ हेल्मेटला बंदी; फुटपाथवर दुचाकी चालवल्यास ५ हजारांचा दंड

Share

हाफ हेल्मेट वापरणाऱ्यांवर निर्बंध नव्या वर्षापासून नियम लागू करण्याची तयारी फुटपाथवर दुचाकी चालवल्यास पहिल्यांदा ५ हजारांचा दंड दुसऱ्यांदा नियम मोडल्यास १० हजारांचा दंड

राज्यात दुचाकीस्वारांसाठी वाहतूक नियम अधिक कडक करण्याची तयारी सुरू आहे. हाफ हेल्मेटच्या वापरावर बंदी आणि फुटपाथवर दुचाकी चालवणाऱ्यांसाठी दंडवाढीचा निर्णय नव्या वर्षापासून लागू करण्याचे संकेत परिवहन मंत्री बैरती सुरेश यांनी दिले आहेत.

रस्ते अपघात रोखणे आणि दुचाकीस्वारांची सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने राज्यभर हाफ हेल्मेटच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याच्या घटना लक्षात घेता निकृष्ट दर्जाची हाफ हेल्मेट तयार करणारे कारखाने बंद करण्यासह यासंदर्भातील कायदेशीर तरतुदींची तपासणी करून स्वतंत्र कायदा करण्याचा परिवहन विभागाचा विचार आहे. बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री बैरती सुरेश यांनी नव्या वर्षापासून हे नियम लागू करण्याचे संकेत दिले.

दुसरीकडे, पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवरून दुचाकी चालवणाऱ्यांविरोधात दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे. सध्या एक हजार रुपये असलेला दंड पहिल्या उल्लंघनासाठी पाच हजार रुपये, तर दुसऱ्यांदा नियम मोडल्यास दहा हजार रुपये करण्यात येणार आहे. तिसऱ्यांदा नियमभंग केल्यास संबंधित दुचाकी जप्त करण्याची तरतूद असलेला कठोर कायदा सरकारच्या मंजुरीने लागू करण्याचा इशाराही परिवहन मंत्र्यांनी दिला.

Tags: