gokak

गोकाकमधील घरफोडीचा छडा; दोघांना अटक, ७.२२ लाखांचे दागिने जप्त

Share

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात गोकाक शहर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून ७ लाख २२ हजार ७०० रुपये किमतीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

गोकाक शहरातील विवेकानंदनगर पहिल्या क्रॉसमधील कैसर उस्मान बाबुसाब देवडी यांच्या घराचे कुलूप तोडून १५ ऑक्टोबरच्या रात्री चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे आणि हिऱ्यांचे दागिने तसेच रोकड असा एकूण १५ लाख ५८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी गोकाक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाने कारवाई केली. या पथकाने जुने हुबळी येथील कैनअहमद ऊर्फ बाबाजान सुदर्जी (५८) आणि हुसेनसाब कनवळी (३२) या दोघांना अटक केली.

आरोपींकडून ४५.५ ग्रॅम सोने, २६० ग्रॅम चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ७ लाख २२ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Tags: