आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते बस्तवाड (हलगा) आणि चंदन होसूर येथे रस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

बस्तवाड येथे २.४० कोटी रुपये खर्चून मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आणि विविध ठिकाणी पेव्हर्स बसविण्यात येणार आहेत. चंदन होसूर येथेही २.४० कोटी रुपये खर्चून अंतर्गत रस्त्यांवर पेव्हर्स बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

या कामांमुळे गावांतील वाहतूक अधिक सुलभ होणार असून, नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

यावेळी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, ग्रामीण भागातील नागरिकांना चांगले रस्ते आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले प्राधान्य आहे. ग्रामस्थांच्या मागण्या लक्षात घेऊन विकासकामे हाती घेण्यात येत आहेत.
बस्तवाड येथे रस्त्यांसोबतच गटार व्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणे आणि घरांमध्ये पाणी शिरण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते, गटारे आणि पिण्याच्या पाण्यासारख्या सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी दोन्ही गावांतील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



Recent Comments