Belagavi

गोंधळी गल्लीतील रिक्षा स्टँडच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर अष्टेकर

Share

स्वामी विवेकानंद ऑटो रिक्षा स्टँडच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

गोंधळी गल्लीतील स्वामी विवेकानंद ऑटो रिक्षा स्टँडच्या सदस्यांची वार्षिक सभा दीपावली बलिप्रतिपदेनिमित्त पार पडली. या सभेत अध्यक्षपदी ज्ञानेश्वर अष्टेकर, उपाध्यक्षपदी लक्ष्मण चलवेटकर, सचिवपदी अशोक कोनेवाडी, उपसचिवपदी राजू कांबळे, खजिनदारपदी ज्योतिबा पाटील आणि उपखजिनदारपदी भरत उंदरे यांची निवड करण्यात आली.

सल्लागार मंडळावर बबन भोबे, महेश किल्लेकर, ज्योतिबा अष्टेकर आणि विनायक पुजारी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे पूजन करून मिठाईचे वाटप करण्यात आले.

Tags: