बेंगळुरू येथे होणाऱ्या १४ वर्षांखालील मिनी ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघात कौंदल गावचा उदयोन्मुख खेळाडू कार्तिक महेश जळगेकर याची अधिकृत निवड झाली आहे.
बेळगावच्या सेंट झेवियर्स शाळेचा विद्यार्थी असलेल्या कार्तिकची जिल्हा संघाचा मिडफिल्डर म्हणून वर्णी लागली असून, १३ नोव्हेंबर रोजी तो संघासह बेंगळुरूकडे रवाना झाला. प्रशिक्षक मानस नायक, रविशंकर माळशेठ, चेस्टर रोझारिओ आणि पालकांच्या प्रोत्साहनामुळे त्याला हे यश मिळाले आहे. या निवडीबद्दल कौंदल आणि खानापूर परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.



Recent Comments