बेळगावात १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
बिर्ला इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडणार आहे. यामध्ये भारताच्या विविध विभागांसह दुबई, सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, कतार, बहरीन, शारजाह, येमेन आणि युएई या आखाती देशांतील सुमारे १२०० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. बेळगावला प्रमुख स्केटिंग केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन उमेश कलघटगी यांनी केले.

स्पर्धेच्या तयारीबाबत माहिती देताना प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी सांगितले की, यामध्ये एकूण १०२ विविध शर्यती होणार आहेत. रिंक शर्यती ओमनगर येथील शिवगंगा स्पोर्ट्स क्लबमध्ये, तर रोड शर्यती बीएसएनएल कार्यालयापासून चंदन थिएटरपर्यंतच्या मार्गावर आयोजित करण्यात आल्या आहेत. उद्घाटन समारंभाला आमदार अभय पाटील, महापौर प्रीती कामकर आणि राज्य असोसिएशनचे सचिव इंदुधर सीताराम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी २० अधिकारी, १५ प्रशिक्षक, २० शिक्षक आणि वैद्यಕीय पथक तैनात करण्यात आल्याचे सूर्यकांत हिंडलगेकर यांनी स्पष्ट केले.


Recent Comments