Vijayapura

उसाच्या दरासाठी विजापूरचे शेतकरी आक्रमक; प्रतिटन ३६०० रुपये दरासाठी कारखान्याचे प्रवेशद्वार रोखले

Share

विजापूर जिल्ह्यातील इंडि तालुक्यात असलेल्या हिरेबेनूर गावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.

प्रतिटन ३,६०० रुपये दर मिळाल्याशिवाय साखर कारखाना सुरू करू देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर काटेरी झुडपे टाकून शेतकऱ्यांनी आपला निषेध नोंदवला. ऊस लागवडीचा खर्च, मजुरी आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून, पिकाला योग्य दर मिळणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कारखाना व्यवस्थापनाने या मागणीची दखल घेऊन प्रतिटन ३,६०० रुपये दर जाहीर करावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा उत्पादकांनी दिला आहे.

Tags: