बालदिनानिमित्त उद्या १४ नोव्हेंबर रोजी विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथील ए. बी. जत्ती शाळेत बाल विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सुमारे १० हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली.

या विज्ञान जत्रेला जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील आणि शालेय शिक्षण व साक्षरता मंत्री मधु बंगारप्पा उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती, सृजनशीलता आणि नवनिर्मितीची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना, वैज्ञानिक विचारांना आणि नवीन प्रयोगांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही विज्ञान जत्रा महत्त्वाची ठरेल, असा विश्वास मंत्री एम. बी. पाटील यांनी व्यक्त केला.


Recent Comments