Belagavi

बेळगावात अल्ट्राव्हायोलेटचे नवे शोरूम सुरू

Share

बेळगावातील वाहनप्रेमींसाठी उद्यमबाग येथे ‘अल्ट्राव्हायोलेट स्पेस स्टेशन’ हे इलेक्ट्रिक बाइकचे नवे शोरूम सुरू करण्यात आले. डोणी कुटुंबीयांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या शोरूममध्ये अत्याधुनिक X-47 इलेक्ट्रिक बाइकचे अनावरण करण्यात आले.

उद्यमबाग येथील नागशांती हुंडाईसमोरील आकाश एम्पायर येथे डॉनब्रो एअरबेसच्या वतीने या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार अनिल बेनके, व्हीपी सेल्स हेड व्यंकटरमण, राजशेखर डोणी, चंद्रशेखर डोणी आणि तनिष्क डोणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांची गरज लक्षात घेता, आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली ही बाइक ग्राहकांसाठी नवा पर्याय आहे. बाइकची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी हुबळी-धारवाड आणि कोल्हापूर येथूनही ग्राहक येत असून, नागरिकांनी शोरूमला भेट देऊन टेस्ट राइड घ्यावी, असे आवाहन माजी आमदार अनिल बेनके यांनी केले.

नव्या X-47 इलेक्ट्रिक बाइकला रडार तंत्रज्ञानासह पुढील आणि मागील बाजूस कॅमेरे देण्यात आले आहेत. एका चार्जमध्ये ३०० ते ३४० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापण्याची क्षमता या बाइकची आहे. कॉम्बॅट, ग्लाइड आणि बॅलिस्टिक असे तीन रायडिंग मोड असून, बॅटरी आणि मोटारसाठी आठ वर्षे किंवा आठ लाख किलोमीटरची वॉरंटी देण्यात येत असल्याची माहिती तनिष्क डोणी यांनी दिली.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Tags: