Dharwad

दिवाळीत मुक्या जनावरांप्रती कृतज्ञता; धारवाडमध्ये गवळी समाजाची म्हशींची अनोखी स्पर्धा

Share

दिवाळी हा सण केवळ आनंदाचा नव्हे, तर वर्षभर साथ देणाऱ्या मुक्या जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाही सण आहे. हीच परंपरा जपत धारवाडमध्ये गवळी समाजाच्या वतीने दिवाळीनिमित्त म्हशींच्या पळण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने गवळी समाजाकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा शहरातील चन्नबसवेश्वर चौकापासून रेल्वेस्थानकापर्यंत ही स्पर्धा पार पडली. यात शंभरहून अधिक म्हशी सहभागी झाल्या होत्या. मालकांच्या दुचाकीचा आवाज आणि वास ओळखून म्हशी त्यांच्या मागे धावत असल्याचे दृश्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. वर्षभर शेती आणि दैनंदिन कामात मोलाची साथ देणाऱ्या जनावरांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा गवळी समाजाने यंदाही जपली.

Tags: