बेळगावच्या जलतरणपटूंनी गोव्यातील स्पर्धेत ४८ पदकांची कमाई करत उल्लेखनीय यश मिळवले. चार खेळाडूंनी वैयक्तिक अजिंक्यपदे पटकावली.
पणजी येथे ‘फिट फॉर लाईफ’ आयोजित आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आभा आणि हिंद स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी २० सुवर्ण, १५ रौप्य आणि १३ कांस्य अशी एकूण ४८ पदके जिंकली.

कुमार तनुज सिंग याने ग्रुप १ मध्ये पाच सुवर्णपदकांसह वैयक्तिक अजिंक्यपद मिळवले. तसेच ‘फास्टेस्ट स्विमर’चा किताब आणि सहा हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. कुमार दक्ष जाधव याने ग्रुप ३ मध्ये तीन सुवर्ण व एक रौप्य पदक, तर कुमार अद्वैत जोशी याने ग्रुप ४ मध्ये पाच सुवर्णपदकांसह वैयक्तिक अजिंक्यपद मिळवले. कुमारी वर्धा उप्पार हिने ग्रुप ५ मध्ये दोन सुवर्णपदकांसह वैयक्तिक विजेतेपद पटकावले.
आदी शिरसाठ, अर्णव किल्लेकर, वर्धन नाकाडी, विराट उप्पार, धैर्य शिंदे, शिवा पोटे, आस्था काकडे, तनिषा खनुकर, आराध्या तिवारी, जिजा करलेकर आणि पुनर्वी मोगेकर यांनीही पदके जिंकली. या खेळाडूंना प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजित पाटील आणि क्लबचे अध्यक्ष अरविंद संगोळी यांचे मार्गदर्शन लाभले.


Recent Comments