Belagavi

शेतकरी आंदोलनाचा बेळगावच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

Share

बेळगावातील शेतकरी आंदोलनाचा परिणाम आता शहराच्या पाणीपुरवठ्यावरही झाला आहे. हिडकल जॅकवेल येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे पंपिंग प्रक्रिया थांबवण्यात आली असून, शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास हिडकल जॅकवेल येथील पाणी उपसा प्रक्रिया बंद करण्यात आली. त्यामुळे बेळगाव शहराचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. पंपिंग प्रक्रिया पूर्ववत सुरू होईपर्यंत शहरातील विविध भागांत पाणीपुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

संबंधित अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: