शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ विजापूर जिल्ह्यातील कोल्हारजवळ शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त शेतकऱ्यांनी विजापूर-बागलकोट राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

यूकेपी परिसरात झालेल्या या आंदोलनस्थळी पोलिसांनी धाव घेत आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. चुन्नाप्पा पुजारी यांची सुटका होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार शेतकरी नेते महंतश गिड्डप्पगोळ यांनी व्यक्त केला.



Recent Comments