बसवनकुडची येथील केएलई विद्यापीठाच्या केएलई कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि केंद्र सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या मै भारत केंद्रातर्फे जिल्हास्तरीय विकसित भारत युवा संसद भाषण स्पर्धा पार पडल्या.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ हा या भाषण स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेत शेकडो युवकांनी सहभाग घेतला. त्यातून जिल्ह्यातील तीन स्पर्धकांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड केली जाणार आहे.


या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले डॉ. सुनील जलालपुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, देशाच्या विकास प्रक्रियेत युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा युवा अधिकारी संग्राम सावंत यांनी मै भारत केंद्र आणि युवा संसद उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाला डॉ. अश्विनी नरसण्णवर, वीरकुमार जप्ती, डॉ. पूजा नीलगार, डॉ. विजया दंडण्णवर, प्रकाश कमती आणि मल्लय्या करडी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरकुमार यांनी केले.


Recent Comments