बस्सापूर येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या बेमुदत आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याची प्रकृती अचानक खालावली. ते बेशुद्ध पडल्याने आंदोलनस्थळी काही काळ धावपळ उडाली.
५ नोव्हेंबर रोजी आंदोलन सुरू असताना सरकारच्या दुर्लक्षाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या एका ज्येष्ठ शेतकऱ्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते खाली कोसळले. हे पाहताच सहकारी शेतकरी आणि पोलिसांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, रुग्णालय परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



Recent Comments