Belagavi

बेळगाव मधील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Share

ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनातील नेते चून्नप्पा पुजारी आणि शशिकांत गुरूजी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ बेळगावात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. राणी चन्नम्मा सर्कल येथे एकत्र आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नेत्यांची बिनशर्त सुटका करावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी त्यांनी सर्कल परिसरात ठिय्या मांडून सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

दरम्यान, आंदोलकांनी प्रमुख रस्त्यावर मानवी साखळी करून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. जमावबंदीचे आदेश लागू असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना बळजबरीने ताब्यात घेऊन पोलीस वाहनांतून हलवले.

Tags: