Hukkeri

संकेश्वरमध्ये कन्नड राज्योत्सव उत्साहात साजरा

Share

हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरात कन्नड राज्योत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राज्योत्सव समितीचे अध्यक्ष गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या सोहळ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सकाळी गांधी चौकात निडसोशी दुरदुंडेश्वर मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामी आणि शंकरलिंग मठाचे विद्या नरसिंह महास्वामी यांच्या सान्निध्यात वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विविध देखाव्यांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला.

विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी साकारलेले सांस्कृतिक देखावे आणि चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण ठरले. आमदार निखिल कत्ती आणि विद्युत सहकारी संघाचे संचालक विनय पाटील यांनी भुवनेश्वरी मूर्तीचे पूजन करून उत्सवात सहभाग घेतला. शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली.

सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात साहित्यिक व्ही. एस. माळी, पोलीस निरीक्षक गणपती कोगनोळी, मुख्याधिकारी प्रकाश मठद, गटशिक्षणाधिकारी रेवती मठद आणि डॉ. पूर्णिमा तल्लूर यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी अॅड. विक्रम करनिंग आणि दिलीप होसमनी यांनी सीमाभागातील संकेश्वरमध्ये सर्व समाजातील नागरिक एकत्र येऊन कन्नड राज्योत्सव साजरा करतात, असे सांगितले.

राज्योत्सव समितीचे अध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष शंकर भोसले, प्रधान सचिव संतोष पाटील, सचिव चेतन चौगला, खजिनदार अविनाश चव्हाण, रोहन नेसरी, शिवानंद मुडशी, बंडू हतनुरी, अमर नलवडे, अविनाश नलवडे यांच्यासह समितीचे सदस्य आणि कन्नडप्रेमी उपस्थित होते.

राजू बागलकोटी इन न्यूज, हुक्केरी

Tags: