Belagavi

माळमारुतीचे सीपीआय गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक

Share

बेळगावच्या माळमारुती पोलीस ठाण्याचे सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक जाहीर झाले आहे.

गड्डेकर यांनी कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणासह कुख्यात लक्ष्मण दड्डी टोळीच्या हत्या प्रकरणाचा पुराव्यांच्या आधारे तपास केला. या प्रकरणांतील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. कर्तव्यनिष्ठा, गुन्हे नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यातील त्यांच्या कार्याचीही दखल घेण्यात आली आहे.

गड्डेकर यांना यापूर्वी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले आहे. आता केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दक्षता पदकामुळे त्यांच्या सन्मानात आणखी भर पडली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस विभागातून आणि नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.

Tags: