Belagavi

‘घरकुल’ वृद्धाश्रमाचा ३ नोव्हेंबरला रौप्यमहोत्सव

Share

बेळगावातील स्वामी छाया प्रतिष्ठान संचालित ‘घरकुल’ वृद्धाश्रमाला २५ वर्षे पूर्ण झाली असून, ३ नोव्हेंबरला रौप्यमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती अनिल पोतदार यांनी दिली.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संस्थापक मुकुंदराव पोतदार यांनी १ मे २००१ रोजी नरगुंदकर वाड्यातील एका छोट्या खोलीत आश्रमाची सुरुवात केली. ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढल्यानंतर कॅम्प परिसरातील बंगल्यात आणि त्यानंतर बेनकनहळ्ळीजवळ सुमारे एक एकर जागेवर मंदिरासह प्रशस्त इमारतीत आश्रमाचा विस्तार करण्यात आला.

निवृत्त बँक अधिकारी राजीव पोतदार हे सध्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ३ नोव्हेंबरला होणाऱ्या रौप्यमहोत्सवाला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, उद्योजक सबनीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आश्रमाला देणगी देणाऱ्यांना केंद्र सरकारच्या नियमानुसार 12A, SR आणि 80G अंतर्गत करसवलतीचे लाभ मिळतात. या सेवाभावी उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अनिल पोतदार यांनी केले.

Tags: