Belagavi

बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंचे यश

Share

म्हैसूर येथे झालेल्या राज्यस्तरीय दसरा सीएम कप जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी करत एकूण १३ पदके आपल्या नावावर केली आहेत. या स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी विविध विभागांत उल्लेखनीय यश मिळवले आहे.

म्हैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दसरा सीएम कप जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा आणि हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी लक्षणीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्यांनी एकूण १३ पदके जिंकून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

स्पर्धेत तनुज सिंग याने दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह एकूण सात पदके पटकावली. याशिवाय कुमार चिन्मय बागेवाडी, आदि शिरसाट आणि वेदा खानोलकर यांनीही विविध स्पर्धात्मक विभागांत पदके जिंकून क्लबचा गौरव वाढवला आहे.

या सर्व खेळाडूंना एनआयएस प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजित पाटील तसेच आयोजकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे.

Tags: