Chikkodi

मलिकवाड येथे रिंग रोड योजना रद्द करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

Share

चिक्कोडी तालुक्यातील मलिकवाड गावात प्रस्तावित रिंग रोडचे काम तात्काळ रद्द करण्यात यावे आणि गावाचा एकसंबा शहरात समावेश करू नये, या मागणीसाठी मलिकवाड ग्रामस्थांच्या वतीने उपतहसीलदार परिमला देशपांडे यांच्यामार्फत सरकारला निवेदन देण्यात आले.

निवेदन सादर केल्यानंतर बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की, मलिकवाड गाव हे संपूर्णपणे कृषीप्रधान असून येथील जमीन अत्यंत सुपीक आहे. येथे रिंग रोडची उभारणी झाल्यास सुपीक शेतजमीन नष्ट होऊन शेतकरी देशधडीला लागतील. तसेच गावाचा एकसंबा शहरात समावेश केल्यास लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

शासनाने व प्रशासनाने तातडीने रिंग रोड योजना रद्द करावी आणि मलिकवाड गावाचा यकसंबा शहरात समावेश करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा. अन्यथा येत्या काळात सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी मलिकवाड गावातील प्रमुख नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: