Kittur

कित्तूर उत्सव २०२६ चा दिमाखदार शुभारंभ

Share

इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकून विजय मिळवणाऱ्या वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या ऐतिहासिक द्विशतकोत्तर विजयोत्सवाला आणि यंदाच्या कित्तूर उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे.

उत्सवानिमित्त राज्यभरात प्रवास केलेल्या वीरज्योतीचे कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी कित्तूर शहरातील चन्नम्मा सर्कलमध्ये स्वागत केले आणि संस्थानच्या ध्वजाचे रोहण केले. त्यानंतर त्यांनी राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

उत्सवानिमित्त आयोजित ‘कला वाहिनी’ या आकर्षक लोककलापथकांच्या मिरवणुकीचा शुभारंभ राजगुरु संस्थान कल्मठाचे मडीवाळ राजयोगेंद्र स्वामीजी, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते झाला.

चन्नम्मा सर्कलपासून सुरू झालेली ही मिरवणूक निच्चणिकी मठाच्या आवारापर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध लोककला पथकांनी सहभाग नोंदवून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले, तसेच विविध शासकीय विभागांच्या चित्ररथांद्वारे लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.

Tags: