हुबळी शहरात मांजामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर आज धडक मोहीम राबवूनही अद्याप मांजाचा धोका टळलेला नाही. काल घडलेल्या दुर्घटनेनंतर आज पुन्हा एक तरुण मांजामुळे जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
गुरुवारी सकाळी मांजामुळे महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना ताजी असतानाच, उणकल परिसरात आणखी एका तरुणाला मांजा लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. काल संध्याकाळी उणकल येथे घडलेल्या या दुर्घटनेत तरुणाच्या तोंडाला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एकापाठोपाठ एक अशा घटना घडत असल्याने पतंगाच्या नावाखाली वापरला जाणारा मांजा निष्पापांच्या जिवावर बेतत आहे. बंदी आणि कायदेशीर कारवाईचे इशारे देऊनही मांजाचा वापर सुरूच राहिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


Recent Comments