गुरुवारी हुबळीत मांजा गळ्याला आवळल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर धारवाड पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी शहरातील बंदी घातलेला पतंगाचा मांजा विक्री करणाऱ्या दुकानांवर धाडी टाकून दुकानदारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.

पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा धोकादायक मांजा स्कुटीवरून जाणाऱ्या विद्या नावाच्या महिलेच्या गळ्याला लागल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर धारवाड पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी मोहीम राबवून विक्रीसाठी ठेवलेला मांजाचा मोठा साठा जप्त केला आहे. धारवाडमधील भुसप्पा चौक जवळील एका दुकानात बेकायदेशीरपणे मांजाची विक्री होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मांजा जप्त केला असून दुकानदाराविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली आहे.



Recent Comments