बेळगाव तालुक्यातील ऐतिहासिक हलगा गावात पारंपरिक दसरा महोत्सव अत्यंत श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. गावातील श्री ब्रह्मदेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे पार पडणारा प्रसिद्ध ‘बन्नी मुडपण्याचा’ सोहळा हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.

बेळगाव तालुक्यातील हलगा गावात शेकडो वर्षांची परंपरा असलेला दसरा उत्सव यंदाही उत्साहात पार पडला. सणानिमित्त गावातील श्री कलमेश्वर मंदिरापासून श्री ब्रह्मदेव मंदिरापर्यंत भव्य पालखी सोहळा आणि मिरवणूक काढण्यात आली होती. पालखी ब्रह्मदेव मंदिरात पोहोचल्यानंतर तेथे शास्त्रोक्त पद्धतीने विशेष पूजा करण्यात आली.


या धार्मिक विधीनंतर उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला बन्नी मोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शुभेच्छांची देवाणघेवाण करत ग्रामस्थांनी दसरा महोत्सवाचा आनंद लुटला.



Recent Comments