Belagavi

बेळगावात श्री दुर्गामाता दौड उत्साहात संपन्न

Share

धार्मिक उपक्रमांचे केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव शहरात श्री दुर्गामाता दौड अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. आठव्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या दौडमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते.

ताशिलदार गल्लीतील सोमनाथ मंदिरात प्रेरणा मंत्राचे पठण, ध्वजारोहण आणि महाआरती करून आठव्या दिवसाच्या श्री दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. दौडच्या मार्गावर महिलांनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, भाविकांनी केलेली पुष्पवृष्टी आणि आरती यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

या वेळी नवदुर्गेच्या रूपात सजलेल्या मुली, संत बाळूमामांची वेशभूषा आणि रणरागिणींनी सादर केलेली युद्धकलेची साहसी प्रात्यक्षिके उपस्थितांचे मुख्य आकर्षण ठरली.

ही दौड फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनिमंदिर मार्ग, मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, लोकमान्य रंगमंदिर मार्ग, कोनवाळ गल्ली, अनुपम हॉटेल रोड, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, शिवाजी रोड, मुजावर गल्ली, कांगली गल्ली, स्टेशन रोड, पाटील मळा आणि भांदूर गल्लीमार्गे मार्गस्थ होत पाटील गल्लीतील शनिमंदिराजवळ सांगता झाली.

मंगळवारी मारुती गल्लीतील मारुती मंदिरापासून सुरू होणारी दौड छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकात पोहोचून जाहीर सभेच्या स्वरूपात दौडीची सांगता होणार आहे.

Tags: