बेळगाव येथील प्रमुख राणी चन्नम्मा चौकात शेतकऱ्यांनी छेडलेल्या मानवी साखळी आंदोलनामुळे शहरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. चौकाला जोडणाऱ्या चारही मुख्य रस्त्यांवर किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने रुग्णवाहिका आणि इतर आणीबाणीच्या वाहनांनाही रस्ता मिळणे कठीण झाले.


विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगावच्या ऐतिहासिक राणी चन्नम्मा चौकात शेतकऱ्यांनी उभारलेल्या मानवी साखळी आंदोलनामुळे संपूर्ण शहर स्तब्ध झाले. राणी चन्नम्मा चौकाकडे जाणाऱ्या चारही प्रमुख मार्गांवर किलोमीटरपर्यंत वाहने साचून राहिल्याने भीषण वाहतूक कोंडी झाली. रस्ते पूर्णपणे बंद झाल्याने आणीबाणीच्या स्थितीत असलेल्या दोन ॲम्बुलन्स आणि एक शववाहिका रस्त्याच्या मध्यभागीच अडकून पडल्याचे पाहायला मिळाले. यामुळे शेकडो वाहनधारक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.



Recent Comments