Belagavi

बेळगावमध्ये कॅफे मालकावर प्राणघातक हल्ला

Share

बेळगावमधील रेसकोर्स रोडवरील एका कॅफे मालकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिक आणि संबंधितांनी एपीएमसी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून हल्लेखोरांच्या अटकेची मागणी केली.

बेळगावमधील रेसकोर्स रोडवरील टीव्ही सेंटर जवळील कॅफेमध्ये रात्रीच्या वेळी शस्त्रे घेऊन घुसलेल्या २० ते २५ जणांच्या गटाने कैफ शेरखान यांच्यावर हल्ला केला . बालमित्रांच्या या कृत्यामागे व्यावसायिक सुडाची भावना असल्याचे बोलले जात असून या प्रकरणी अरमान, शम्याम आणि माया या तीन प्रमुख हल्लेखोरांविरुद्ध एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिस्थिती गंभीर असल्याने कायदा व सुव्यवस्था डीसीपी नारायण बरमनी यांनी घटनास्थळी भेट देऊन संतप्त नागरिकांशी चर्चा केली आणि दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Tags: