Belagavi

सुळेभावीच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रौत्सवाचा उत्साह

Share

बेळगावजवळील सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, दररोज हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावत आहेत.

बेळगाव शहरापासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात ५०० वर्षांची परंपरा असणाऱ्या देवस्थानात नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक आरास केली जात असून कर्नाटकसह शेजारील राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने याठिकाणी दर्शनासाठी येत आहेत.

वाल्मीकी समाजाच्या पुजाऱ्यांकडून सोप्या पद्धतीने केली जाणारी पूजा हे या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. दर पाच वर्षांनी येथे भरणारी यात्रा भाविकांचे श्रद्धास्थान असून, नवरात्रौत्सवाच्या काळातही संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: