Belagavi

प्रल्हाद जोशी यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून शेतकऱ्यांचे आंदोलन

Share

विविध मागण्या मान्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, हुबळीपर्यंत पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागेवाडी टोल नाक्याजवळ शेकडोच्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी प्रल्हाद जोशी यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाची दिशा बदलली आहे. आता हिरेबागेवाडीहून पदयात्रेने हुबळीच्या दिशेने कूच करून आपला आवाज अधिक तीव्र करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Tags: