Belagavi

बेळगावमधील बेकायदेशीर कृत्यांवर नव्या पोलीस आयुक्तांची कडक कारवाई

Share

बेळगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नव्या पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या कारवाईचे स्वागत करत, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई न झाल्यास पोलीस आयुक्तांविरोधातही आवाज उठवू, असा इशारा आमदार अभय पाटील यांनी दिला आहे.

बेळगाव शहरात दिवसेंदिवस वाढणारे गँगवॉर, जुगार आणि मटका यांसारख्या बेकायदेशीर प्रकारांवर आमदार अभय पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास माजी पोलीस आयुक्तांचा ढिसाळ कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.

नव्या पोलीस आयुक्तांच्या कारभाराने नागरिकांमध्ये आशेचे वातावरण आहे. त्यांनी केवळ आश्वासनांपर्यंत न राहता अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केल्यास लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण सहकार्य केले जाईल. मात्र, ढिलाई झाल्यास त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जातील, असे आमदार अभय पाटील यांनी म्हटले.

Tags: