Bagalkot

जमखंडी शुगर कारखाना अकाउंटंट अपहरण प्रकरणी दोघांवर आरोप

Share

जमखंडी शुगर कारखान्यात घुसून सुमारे २०० हून अधिक जणांच्या जमावाने अकाउंटंट रजनिश वर्मा यांना मारहाण करून त्यांचे अपहरण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या घटनेमुळे जमखंडी शुगर कारखान्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रजनिश वर्मा यांच्या पत्नीने माजी अध्यक्ष आनंद न्यामगौडा आणि बसवंत न्यामगौडा यांच्यावर थेट आरोप केले आहेत.

साखर विक्रीतील गैरव्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाणीवरून कोणताही दोष नसताना आपल्या पतीवर २०० जणांच्या जमावाने हल्ला केला. तसेच कार्यालयाची तोडफोड करून त्यांना बळजबरीने पळवून नेले, असा आरोप त्यांनी अश्रू अनावर होत केला.

या अमानुष कृत्याला आनंद आणि बसवंत न्यामगौडा हेच थेट जबाबदार असून, रजनिश वर्मा यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी त्यांचीच राहील, असा संतप्त इशाराही त्यांच्या पत्नीने दिला आहे.

Tags: