खानापूर तालुक्यातील पारिश्वाड गावात श्री लक्ष्मी देवी चौकट पूजा महोत्सव अत्यंत श्रद्धेने पार पडला. या कार्यक्रमात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

खानापूर तालुक्यातील पारिश्वाड गावात आयोजित श्री लक्ष्मी देवी चौकट पूजा कार्यक्रमात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सहभागी होऊन देवीची विशेष पूजा केली. यावेळी राज्यातील जनतेला सुख, शांती आणि समृद्धी लाभो, तसेच शेतकऱ्यांना चांगले पीक-पाणी मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली.
आपली धार्मिक परंपरा, संस्कृती आणि सण-उत्सव पुढील पिढीसाठी जतन करणे हे आपले सर्वांचे प्रमूक कर्तव्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या धार्मिक कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments