Khanapur

“खानापूरात राज्योत्सव पूर्वभावी बैठकीला तहसीलदार,आमदाराची उपस्थिती वेळेत नसल्याने करवेची नाराजी”

Share

सालाबाद प्रमाणे यंदाही १ नोव्हेबर रोजी होणार्या राजोत्सव पूर्व भावी बैठकीचे आयोजन तहसील कार्यालयाच्यावतीने सोमवारी दि.१३ आक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात करण्यात आले होते.

राज्योत्सवाच्या पूर्वभावी बैठकीला तालुक्यातील विविध संघटनेचे नेते, सामाजिक कार्यकत्यासह करवेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सकाळी बरोबर ११ वाजण्याच्या सुमरास तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोठ्या दाटीवाटीने उपस्थित होते.
यावेळी सभागृहातील व्यासपिठावर केवळ उपतहसीलदार एस के तंगोळी, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्रीसह पंचहमी योजना तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी व तालुक्यातील विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी तब्बल दुपारी साडेबारा वाजे पर्यत तहसीलदार व आमदार व्यासपिठावर उपस्थित नसल्याने बसुन कंटाळलेल्या करवेच्या कार्यकर्त्यानी नाराजी व्यक्त करत तहसील कार्यालयातील सभागृहात घोषणा बाजी करत राज्योत्सव पुर्व भावी बैठकीचा त्याग केला.
खानापूर तालुक्यात घडलेली ही पहिलीच घटना घडल्याने सर्व संघटनेचे पदाधिकारी व नेते मंडळी सभात्याग करत बाहेर पडले.तब्बल दीड तासानंतर तहसीलदार दुंडाप्पा कोमार तहसील कार्यालयात प्रवेश केला.
यावेळी प्रवेशव्दारात करवेच्या कार्यकर्त्यानी घोषणाबाजी केली.यावेळी तहसीलदारानी वेळ झाल्याची चुक कबुल करत सभेला सुरूवात करण्याची मागणी केली.

सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार नसल्याने अध्यक्षपद तहसीलदारानी स्विकारले व सभेला प्रारंभ झाला. आहवाल वाचनाला प्रारंभ होऊन बराच वेळ झाल्यानंतर दुपारी दीड वाजता खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राज्योत्सव पूर्व भावी बैठकीला हजेरी लावली.
मात्र आमदार सह तहसीलदारानी राज्योत्सव पूर्वभावी महत्वाच्या सभेच्या बैठकूच्या वेळेचे भान नसल्याने सर्वथरातुन नाराजी पसरली.

Tags: