धारवाडमधील वनश्रीनगर येथे बांधकामाधीन इमारतीच्या पंप हाऊसच्या टाकीत एक गाय पडल्याची घटना घडली. गाईचा ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी तातडीने अग्निशामक दलाला माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने अग्निशामक जवानांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर गाईला सुखरूप बाहेर काढले. गाईला कोणतीही दुखापत न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले. अग्निशामक दलाच्या या तत्परतेबद्दल आणि मुक्या प्राण्यांचे प्राण वाचवल्याबद्दल स्थानिकांनी जवानांचे कौतुक केले.



Recent Comments