बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील अतवाड गावात सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सार्वजनिक सभा पार पडली. या सभेत गावच्या सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

गावात रस्ते, पिण्याचे पाणी, गटारी, वीज, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेबाबत आढावा घेण्यात आला. तसेच आधीपासून सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

सभेत ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची नोंद घेत संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी युवराज कदम, बाळू देसूरकर, कल्लाप्पा कडोळकर, मारुती बेळगावकर, जयवंत बाळेकुंद्री, नारायण मासुळे, मारुती हेब्बाळकर, वसंत कणबरकर, नागोजी कणबरकर, वसंत पाटील, सोमनाथ पाटील, पंचायत विकास अधिकारी तोलाटी, तसेच स्थानिक मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.




Recent Comments