Belagavi

कर्नाटक मंत्रिमंडळात लवकरच महिला प्रतिनिधी!

Share

राज्य मंत्रिमंडळात लवकरच एका महिला मंत्र्याचा समावेश केला जाईल, असे सूचक विधान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

गेल्या सहा महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळात महिला प्रतिनिधित्व नसल्याच्या मुद्द्यावर बोलताना, महिलांच्या अपेक्षेनुसार लवकरच मंत्रिमंडळात महिला मंत्री दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजकारणात सत्ता कधीही कायमस्वरूपी नसते, त्यामुळे मिळालेल्या कार्यकाळात लोकोपयोगी कामे करणे महत्त्वाचे असते. मुख्यमंत्री राज्याच्या विकासासाठी अहोरात्र काम करत असल्याचे त्या म्हणाल्या.

पुढील मंत्रिमंडळ विस्तार आणि निर्णय पूर्णपणे पक्षश्रेष्ठींवर अवलंबून आहेत. स्वतः पुन्हा मंत्री होणार का, या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन बाळगल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

Tags: