Belagavi

सदाचारी कैद्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न: जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

Share

बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या सदाचारी कैद्यांना नियमानुसार वेळेपूर्वी मुक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी हिंडलगा कारागृहाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

शासनाच्या आदेशानुसार, जास्त पॅरोल न घेता १४ वर्षे (पुरुष) आणि १० वर्षे (महिला) शिक्षा पूर्ण केलेल्या सदाचारी कैद्यांच्या सुटकेसाठी चाचपणी केली जात असून, सध्या ८ कैद्यांचा प्रस्ताव समितीसमोर आला आहे.

तसेच कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तूंना शासकीय कार्यालयांमध्ये वापरणे आणि विविध मेळाव्यांच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवून देणे यासाठी विशेष पावले उचलली जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Tags: