एसआयआर गोंधळाबाबत राज्य सरकारकडून सध्या तरी कोणतीही स्वतंत्र चौकशी केली जाणार नसून, याप्रकरणी निवडणूक आयोगच चौकशी करेल, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

म्हीसुरू जिल्ह्यातील पेरियापट्टण येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, फॉर्म्स कुठे छापले गेले आणि ते भाजपच्या हातात कसे पोहोचले, याचे सत्य निवडणूक आयोगाच्या चौकशीतूनच समोर येईल, असे सांगितले.

भाजप नेते वरिष्ठांच्या दबावाखाली आरोप करत असून राजकीय फायद्यासाठी विधाने करत आहेत. माझ्याकडून शांतताभंग किंवा कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले.
दसऱ्याच्या जंबूसवारीसाठी इतर राज्यांतील चित्ररथांना आमंत्रित करण्यात आले असून इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नाईस घोटाळ्याच्या आरोपांना कायद्याच्या चौकटीतच सडेतोड उत्तर दिले जाईल, असेही मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.


Recent Comments