कर्नाटकात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट झाली असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाच्या ‘फॉर्म-७’च्या कथित गैरवापरावरून राज्यातील विविध ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथे बोलताना येडियुरप्पा यांनी, पोलिसांवर दबाव आणून भाजप कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात असल्याचा आरोप केला.

या कारवाईविरोधात येडियुरप्पा यांच्यासह विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि इतर नेत्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

भाजप कार्यकर्त्यांविरोधात सुरू असलेली कारवाई त्वरित थांबवावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी बी. एस. येडियुरप्पा यांनी दिला.


Recent Comments