Khanapur

बीडी-कित्तूर रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य : ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या दुर्लक्षावर नागरिक आक्रमक

Share

खानापूर तालुक्यातील बीडी गावातील कित्तूर मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा फेकला जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक व पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

देशभरात स्वच्छता अभियान राबवले जात असताना बीडी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी (PDO) कचरा विल्हेवाटीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून महात्मा गांधी जयंती व ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या उद्दिष्टांना हरताळ फाळला जात आहे.

संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यावर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांनी कडक कारवाई करावी आणि बीडी गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags: