बेळगाव शहरात भाजप नेते डॉ. रवी पाटील आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे अत्यंत चुकीचे आहे, असा संताप माजी मुख्यमंत्री तथा खासदार जगदिश शेट्टर यांनी व्यक्त केला आहे.

गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी, मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेची तपासणी करणे किंवा हरकती नोंदवणे हा अधिकार असताना गुन्हे दाखल केले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्नाटकात काँग्रेस सरकार असून एसआयआर प्रक्रियेनंतर ते निष्कारण आंदोलने करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

या प्रक्रियेत बीएलओ (BLO) जर काही तक्रार करतील तर त्यावर अधिकारी विचार करतील, असे सांगत शेट्टर यांनी स्पष्ट केले की, राज्यातील या दडपशाहीची भाजप गंभीर दखल घेईल आणि काँग्रेसला योग्य ते उत्तर दिले जाईल.


Recent Comments