Belagavi

नव्हेंबरमध्ये बेळगावात काँग्रेसच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धा

Share

बेळगाव महानगर काँग्रेस आणि सतीश जारकीहोळी क्रिकेट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी नोव्हेंबर महिन्यात वॉर्ड स्तरावर भव्य ‘बेळगाव महानगर काँग्रेस ट्रॉफी-२०२६’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सरदार हायस्कूलचे मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बेळगाव शहरात क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी या वॉर्डस्तरीय स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात आमदार आसिफ सेठ, काँग्रेस नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर, आणि शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजासलीम कशीमन्नावर यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

सरदार हायस्कूल मैदान स्पर्धेसाठी मंजूर करण्यात यावे, यासाठी काँग्रेस शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. या भेटीदरम्यान नेत्यांनी मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेतील फॉर्म ७ मधील हरकतींच्या मुद्द्यावरही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Tags: