Belagavi

बेळगाव बिम्स रुग्णालयात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर राष्ट्रीय परिषद

Share

बेळगाव येथील बिम्स सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये वैद्यकीय व नर्सिंग क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित राष्ट्रीय दर्जाची परिषद पार पडली. रुग्णसेवा आणि संशोधनाचा दर्जा वाढवण्यावर या परिषदेत भर देण्यात आला.

“नर्सिंग संशोधन आणि क्लिनिकल सरावात कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर आयोजित या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी काहेरचे डीन डॉ. गविसीद्धय्या सालीमठ यांनी एआय तंत्रज्ञानामुळे नर्सिंग संशोधन, वैद्यकीय सराव आणि शिक्षणाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना बिम्सचे डीन डॉ. विनय दास्तीकोप यांनी वैद्यकीय व परिचारिका शिक्षणात अभियांत्रिकी आणि संगणक शास्त्राच्या समन्वयातून एआय तंत्रज्ञान विकसित होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी संस्थेतील ‘स्किल लॅब’चा पूर्ण वापर करून प्रात्यक्षिक कौशल्यांवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या परिषदेला डॉ. उमेश कुलकर्णी, डॉ. जगदीश गणगी, डॉ. प्रकाश कोडली, डॉ. सरोजा तिगडी, शिल्पा वाली, कांचनमाला सूर्यवंशी आणि आयोजक प्राचार्य डॉ. नामदेव माळगी उपस्थित होते.

Tags: