मतदार यादीतून अल्पसंख्याकांची नावे बेकायदेशीरपणे वगळल्याचा आरोप करत सोशालिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली.


बेळगाव येथे सोमवारी निवडणूक आयोग आणि बीएलओ यांच्या कारभाराविरोधात एसडीपीआयच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. भारतीय संविधानाच्या नियमांचे उल्लंघन करून निवडणूक आयोग एका राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला पाठवण्यात आले.

विशिष्ट समुदाय आणि अल्पसंख्याकांची नावे मतदार यादीतून हटवण्यासाठी छापिल फॉर्म ७ अर्जांचा गैरवापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप पक्षाच्या नेत्यांनी केला. या कटकारस्थानात सहभागी असलेल्या आणि बेकायदेशीर स्वाक्षऱ्या करणाऱ्या बेळगावातील संबंधित बीएलओला तातडीने निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी भूमिका पक्षाच्या प्रतिनिधींनी मांडली.
या निषेध आंदोलनात एसडीपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments